महाराष्ट्रात दंत पर्यटनाला चालना; शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशनमध्ये सामंजस्य करार

0
24

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) यांच्यात दंत पर्यटन (डेंटल टुरिझम) क्षेत्राच्या विकासासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. राजशिष्टाचार, परकीय गुंतवणूक, डायसपोरा आणि आऊटरीच विभागाच्या पुढाकाराने हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.
या करारामुळे महाराष्ट्रातील अत्याधुनिक आणि दर्जेदार दंत उपचार सुविधा देश-विदेशातील रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच टेलि-कन्सल्टेशन, विशेष दंत उपचार, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळणार आहे.
सामंजस्य कराराअंतर्गत दंत आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण, उपचार, संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान आधारित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन परस्पर सहकार्य करणार आहेत.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या वतीने सचिव डॉ. राजेश गवांदे आणि उपसचिव अविनाश सोलावट, तर इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र वैद्यकीय आणि दंत पर्यटन क्षेत्रातील आघाडीचे केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार असून राज्याच्या आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here