सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा ३१ ऑक्टोबर त्र्यंबकेश्वर येथे
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा ३१ ऑक्टोबर त्र्यंबकेश्वर येथे
नाशिक
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग आला असून, कुंभपर्वाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे करण्यात येणार आहे.
ध्वजस्तंभ उभारणी हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. या सोहळ्यानंतर कुंभमेळ्याच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची आणि तयारीची औपचारिक सुरुवात होणार आहे.
देशभरातील साधू-संत, अखाडे, भाविक आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असून, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या आयोजनासाठी प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. लाखो भाविक या पर्वात सहभागी होत असल्याने पायाभूत सुविधा, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यांसाठी विशेष नियोजन केले जात आहे.