मानखुर्दमध्ये मोठी कारवाई; २२० अनधिकृत गोडाऊन हटवून १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

0
26

मुंबई
मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई करत मानखुर्द परिसरातील तब्बल २२० अनधिकृत गोडाऊन आणि गाळे निष्कासित करून सुमारे १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे.
अतिक्रमण निष्कासन मोहिमेअंतर्गत ११ जून २०२६ रोजी मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील नगर भूमापन क्रमांक १/१ तसेच मंडाळे येथील भूमापन क्रमांक ६/१ आणि खाडीलगतच्या शासकीय जागेवरील व्यावसायिक वापरासाठी उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात आली. प्रशासनाच्या नियोजनबद्ध आणि प्रभावी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमण हटवून शासकीय जमिनीचा ताबा पुन्हा मिळविण्यात यश आले.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांविरोधातही अशाच प्रकारची विशेष मोहीम पुढील काळात अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.
शासकीय मालमत्तेचे संरक्षण आणि सार्वजनिक हितासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here