महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर सोडतीत कोट्यवधींची बक्षिसे जाहीर

0
64
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर सोडतीत कोट्यवधींची बक्षिसे जाहीर
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर सोडतीत कोट्यवधींची बक्षिसे जाहीर

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर सोडतीत कोट्यवधींची बक्षिसे जाहीर

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे दरमहा काढल्या जाणाऱ्या मासिक, भव्यतम तसेच साप्ताहिक सोडतींच्या डिसेंबर २०२५ मधील निकालांची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, महाराष्ट्र तेजस्विनी आणि महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

१७ डिसेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव या मासिक सोडतीत G-16/9702 क्रमांकाच्या तिकिटाला प्रथम क्रमांकाचे २७ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. हे तिकीट प्रिन्स लॉटरी, कल्याण यांच्याकडून विक्री करण्यात आले होते.

तसेच १९ डिसेंबर २०२५ रोजी काढण्यात आलेल्या महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष या मासिक सोडतीत GS-03/3405 क्रमांकाच्या तिकिटाला २१ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. हे तिकीट ओम गं गणपतेय नमः लॉटरी, पुणे यांच्याकडून विकले गेले होते.

याशिवाय महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतींतून ७ लाख रुपयांच्या प्रथम क्रमांकाची एकूण सात बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

डिसेंबर २०२५ महिन्यात मासिक व भव्यतम सोडतींतून एकूण १०,१२४ तिकिटांना ७७,५१,१०० रुपये, तर साप्ताहिक सोडतींतून ५९,६३२ तिकिटांना १,८१,४४,६०० रुपयांची बक्षिसे जाहीर झाली असून अनेक भाग्यवान विजेत्यांना मोठा लाभ मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here