माझगांव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष आढावा

0
10
माझगांव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष आढावा
माझगांव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष आढावा

माझगांव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष आढावा

नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या कार्यवाहीची मागणी

मुंबई, दि. ६ ऑगस्ट :
माझगांव ताडवाडी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत नागरिकांच्या सुरक्षेचा व मूलभूत हक्कांचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. या बैठकीस उपस्थित राहून संबंधित पदाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी दिली.

बैठकीदरम्यान माझगांव ताडवाडी परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या विशेष आढावा बैठकीस सहायक आयुक्त अविनाश ढाकणे, आमदार मनोज जामसूतकर, बाळा नांदगावकर, नगरसेविका सोनम जामसूतकर, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील, माझगांव ताडवाडी संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच प्रकल्प विकासक उपस्थित होते. बैठकीत पुनर्विकास प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विकासक यांच्यात समन्वय साधण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here