मालवण बंदरावर सागरी गस्ती केंद्राच्या पोर्टा केबिनचे उद्घाटन
सागरी सुरक्षेला मिळणार बळ
मालवण :
मालवण बंदर (जेट्टी) येथील सागरी गस्ती केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले पोर्टा केबिन असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. आगामी काळात जिल्ह्यातील १४ संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची पोर्टा केबिन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



