सिंधुदुर्गच्या आरोग्य सुविधांबाबत चर्चा; आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांची नितेश राणे यांना सदिच्छा भेट

0
70

कणकवली :
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या.
बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आरोग्य सुविधांचा विस्तार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि नागरिकांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, आरोग्य सेवांमधील सुधारणा आणि भविष्यातील आरोग्यविषयक प्रकल्पांबाबत सकारात्मक विचारविनिमय झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here