मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी

0
9
मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी
मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी

मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी

ससून डॉक विकासाबाबतही महत्त्वपूर्ण बैठक

 प्रतिनिधी
राज्यातील सागरी मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानभवनातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील ससून डॉकचे नूतनीकरण, बीपीटीच्या अखत्यारीतील गोडाऊनांचा वापर तसेच राज्यातील मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलैऐवजी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.

बैठकीत ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह तेथील पायाभूत सुविधांचा विकास, मत्स्यव्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि मत्स्यव्यवसायिकांच्या हिताच्या विविध बाबींवर विचारविनिमय करण्यात आला.
तसेच, मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पर्यावरणीय संतुलन, मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि माशांच्या प्रजनन प्रक्रियेला अधिक संरक्षण मिळावे, या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याबाबत पुढील निर्णयासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस मत्स्यआयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here