मुरुडमध्ये उत्साहात मतदान; सकाळी मंद गती, नंतर वाढली मतदारांची गर्दी

0
105

मुरुड │ प्रतिनिधी

मुरुड नगरपरिषद निवडणुकीत मतदानाची सुरूवात सकाळी उत्साहपूर्ण झाली. पहाटेच्या सत्रात मतदान केंद्रांवर तुलनेने कमी गर्दी दिसत होती; मात्र सकाळ पुढे सरकताच मतदारांची उपस्थिती वाढू लागली आणि काही केंद्रांवर रांगा तयार झाल्याचे चित्र दिसून आले.

हे पण वाचा महाराष्ट्रातील २४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी २० डिसेंबरला मतदान

मतदान सुरळीत पार पडावे यासाठी रायगडचे उपअधीक्षक पुष्कराज सुर्यवंशी, मुरुडचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि शिपाई मकरंद पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

कोळीवाडा परिसरातील ८५ वर्षीय वृद्ध महिलेने मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला, यामुळे ज्येष्ठ मतदारांचा सहभागही उल्लेखनीय राहिला.

दिवसभर मुरुड शहरात मतदान शांततेत आणि सुव्यवस्थेने पार पडले. पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here