मुळे (ता. अलिबाग) येथील पाणंद रस्त्यांची महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली पाहणी

0
11

ग्रामीण दळणवळण सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना; पायाभूत सुविधांना गती

अलिबाग :
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील मुळे (ता. अलिबाग) येथे भेट देऊन पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेत ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
पाणंद रस्ते हे शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी महत्त्वाचे दळणवळणाचे साधन असल्याने त्यांच्या दर्जेदार बांधकामावर आणि वेळेत पूर्णत्वावर विशेष भर देण्याच्या सूचना बावनकुळे यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षभर सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता, प्रगती आणि स्थानिक गरजांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील शेती, वाहतूक आणि आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी नमूद केले.
महसूल विभाग ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून राज्यातील विविध भागांमध्ये पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here