लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

0
50

मुंबई, प्रतिनिधी : लोकमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने रविवार, ३१ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर (Ravindra Natya Mandir) च्या मिनी थिएटरमध्ये करण्यात आले आहे.
भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या, न्यायप्रिय प्रशासक आणि लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग या कार्यक्रमातून सादर करण्यात येणार आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, स्त्रीशक्तीचे प्रभावी नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचे प्रभावी दर्शन रसिकांना घडणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी (Dr. Kiran Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
इतिहासप्रेमी, विद्यार्थी, संशोधक तसेच सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here