वन महोत्सव २०२६ – सवलतीच्या दरात रोपे खरेदीची संधी; १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

0
20
वन महोत्सव २०२६ - सवलतीच्या दरात रोपे खरेदीची संधी; १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
वन महोत्सव २०२६ - सवलतीच्या दरात रोपे खरेदीची संधी; १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

वन महोत्सव २०२६ – सवलतीच्या दरात रोपे खरेदीची संधी; १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत ‘वन महोत्सव २०२६’ उपक्रम राबविण्यात येत असून राज्यभरात नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धन व हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वन विभागाच्या वतीने १५ जून २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध प्रकारची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिक, शेतकरी, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने सन २०२६-२७ मध्ये १० कोटी वृक्षलागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित केले असून या मोहिमेत सर्व घटकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. वृक्षलागवडीमुळे पर्यावरण संतुलन राखणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे तसेच हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यास मदत होणार आहे.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here