वरसोलीच्या श्री भवानी देवी मंदिरात मनमोहक पुष्प आरास; नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे स्वागत

0
12

‘उत्सव नवरात्रीचा, जागर शक्तीचा’; चेतन घरात व मित्र परिवाराची आरास संकल्पना

अलिबाग प्रतिनिधी :
॥ श्री भवानी प्रसन्न ॥
उदे गं अंबे उदे! नवरात्रोत्सवानिमित्त अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील श्री भवानी देवी मंदिरात मनमोहक पुष्प आरास करण्यात आली आहे. विविध फुलांनी सजविलेल्या या आरासेमुळे देवीचा दरबार आकर्षक आणि भक्तिमय झाला आहे. ‘उत्सव नवरात्रीचा, जागर शक्तीचा’ या भावनेतून साकारलेल्या या सजावटीचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे.

या पुष्प आरासेसाठी सौ. अनुश्री मितेश कुलपे राऊळ व कु. वामिका मितेश कुलपे यांचे सौजन्य लाभले आहे. आरासेची संकल्पना श्री. चेतन घरात व मित्र परिवाराची आहे.
नवरात्रोत्सवाच्या मंगलमय वातावरणात श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन भक्तांनी देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
॥ उदे गं अंबे उदे ॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here