विक्रोळीत ‘मराठी दांडिया महोत्सव २०२६’ उत्साहात; अवधूत गुप्ते यांच्या गीतांनी मैदान दुमदुमले

0
10

‘उत्सव आदिशक्तीचा, जागर मराठी मनाचा’; महापौर रितू तावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

विक्रोळी, मुंबई :
विक्रोळी पूर्व येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयोजित भव्य ‘मराठी दांडिया महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. ‘उत्सव आदिशक्तीचा, जागर मराठी मनाचा’ या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात मराठी संस्कृती आणि नवरात्रोत्सवातील भक्तीचा सुरेख संगम पाहायला मिळाला.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वतीने, भाजप आमदार मिहिरभाई कोटेचा यांच्या पुढाकारातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी उपस्थित राहून दांडिया महोत्सवाचा आनंद लुटला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या ऊर्जावान गीतांनी संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या गाण्यांच्या तालावर उपस्थितांनी दांडियाचा आनंद घेतला. भक्ती, संगीत आणि मराठी संस्कृतीचा मिलाफ यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी अध्यक्षा केतकी अरविंद सांगळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी संस्कृतीचा जागर करत नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
SEO Tags: मराठी दांडिया महोत्सव २०२६, विक्रोळी नवरात्रोत्सव, मिहिरभाई कोटेचा, रितू तावडे, अवधूत गुप्ते, दीपक दळवी, छत्रपती संभाजी महाराज मैदान, मुंबई उत्सव बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here