विजयी भाजप नगरसेवकांचा  सन्मान सोहळ्यात गौरव

0
270
विजयी भाजप नगरसेवकांचा  सन्मान सोहळ्यात गौरव
विजयी भाजप नगरसेवकांचा  सन्मान सोहळ्यात गौरव

विजयी भाजप नगरसेवकांचा  सन्मान सोहळ्यात गौरव

रत्नागिरी l

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सहा नगरसेवक व नगरसेविकांचा सोमवारी खास सन्मान करण्यात आला. हा गौरव कार्यक्रम भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमात प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या वर्षा ढेकणे आणि नितीन जाधव यांच्यासह नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, तसेच नगरसेवक राजेश तोंडणकर आणि समीर तीवरेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मान सोहळ्यास भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप रसाळ, सचिन करमरकर, स्वामी स्वरूपानंद संस्थेच्या पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट व हेमंत रेडीज यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

ॲड. दीपक पटवर्धन यांनी सर्व विजयी नगरसेवक व नगरसेविकांचे अभिनंदन करताना, चांगल्या मताधिक्याने मिळालेल्या यशाबद्दल कौतुक व्यक्त केले. त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी काम करण्याचे, नवीन विकास योजना राबविण्याचे तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विशेषतः पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा या क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष देण्याचेही त्यांनी सुचवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here