श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपरिक दशावतार महोत्सव 2026 आयोजित
सावंतवाडी l प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभाग आयोजित लोककला महोत्सव 2026 अंतर्गत चौथा दशावतार महोत्सव दिनांक 7 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत सावंतवाडी राजवाडा येथे सायंकाळी 6.30 ते 10.00 वाजेपर्यंत आयोजित केला जाणार आहे.
महोत्सवात दररोज दोन नाट्य प्रयोग सादर केले जातील.
- 7 जानेवारी 2026 : सायंकाळी 6.30 वाजता – नाईक मोचेमाडकर लोकनाट्यमंडळ मोचेमांड, वेंगुर्ला, ‘नीलमाधव’; रात्री 8.30 वाजता – कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर, ‘गोमय गणेश’.
- 8 जानेवारी 2026 : सायंकाळी 6.30 वाजता – दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला, ‘वेसरोत्पत्ती’; रात्री 8.30 वाजता – जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, दांडेली, ‘गरुड गर्वहरण’.
- 9 जानेवारी 2026 : सायंकाळी 6.30 वाजता – देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवन, कुडाळ, ‘भक्ती महिमा’; रात्री 8.30 वाजता – श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कसई दोडामार्ग, ‘चौरंगीनाथ’.
- 10 जानेवारी 2026 : सायंकाळी 6.30 वाजता – चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी, कुडाळ, ‘क्षणमुखासूर रूपिणी संहार’; रात्री 8.30 वाजता – श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली, ‘धर्मविजय’.
महोत्सवात दिव्यलोकीचा आभास निर्माण करणारी रंगभूषा, इंद्रधनुष्य रंगांची उधळण, उत्कृष्ठ खटकेबाज, उस्फुर्त संवाद, रांगडा अभिनय, पखवाज, तबला, पायपेटी व झांजे यांचा सुसंगत संगीत अनुभव पाहायला मिळणार आहे.
प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संपूर्ण दशावतार महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी सर्व कलाप्रेमींनी उपस्थित राहावे.
हा महोत्सव दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पारंपरिक लोककला जतन करण्यासाठी आणि आजच्या तरुण पिढीला या सांस्कृतिक वारशाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजित केला जात आहे.


