ससून डॉक्सच्या आधुनिकीकरण कामांबद्दल फिनलंड प्रतिनिधींसमवेत नितेश राणे यांची बैठक
ससून डॉक्सच्या आधुनिकीकरण कामांबद्दल फिनलंड प्रतिनिधींसमवेत नितेश राणे यांची बैठक
मुंबई –
ससून डॉक्सच्या आधुनिकीकरण आणि विकास प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिनलंडच्या प्रतिनिधींसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीला फिनलंडच्या उप-महावाणिज्यदूत श्रीमती इव्हा निल्सन तसेच Mirasys कंपनीचे प्रतिनिधी श्री. अरिंदम सरकार उपस्थित होते. यावर्षीच्या सुरुवातीला मुंबईतील फिनलंड वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र शासन यांच्यात ससून डॉक्सच्या विकासासंदर्भात झालेल्या सामंजस्य कराराचा (MoU) यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत ससून डॉक्सच्या आधुनिकीकरण, तांत्रिक सुधारणा, पायाभूत सुविधा विकास आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. मत्स्य व्यवसायाशी संबंधित सुविधा अधिक सक्षम करण्यासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MFDC) चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ससून डॉक्सच्या विकासामुळे मुंबईतील मत्स्य व्यवसायाला चालना मिळण्याबरोबरच मत्स्य व्यावसायिकांसाठी अधिक आधुनिक आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.