साहित्यिक डॉक्टर अनुज केसरकर यांचा पिंगुळी येथे भव्य सत्कार
कुडाळ l प्रतिनिधी
ख्यातनाम साहित्यिक डॉक्टर अनुज अविनाश केसरकर यांचा भव्य सत्कार पिंगुळी येथील संत राऊळ महाराज मठात ३१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आला.
संत शिरोमणी स्व.राऊळ महाराज पुण्यतिथी निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील राऊळ महाराजांच्या मठात दरवर्षीच्या प्रथेनुसार धार्मिक कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते.
या वेळी मठाच्या विविध सामाजिक व धार्मिक कार्यात महत्वाचा वाटा उचलणारे मूळचे सावंतवाडी तालुक्याचे पण सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले डॉक्टर अनुज केसरकर यांचा सत्कार राऊळ महाराजांच्या मुलाकडून करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.


