सुधागड पालीत ‘आत्मा’ अंतर्गत भव्य शेतकरी मेळावा

0
5
सुधागड पालीत ‘आत्मा’ अंतर्गत भव्य शेतकरी मेळावा
सुधागड पालीत ‘आत्मा’ अंतर्गत भव्य शेतकरी मेळावा

सुधागड पालीत ‘आत्मा’ अंतर्गत भव्य शेतकरी मेळावा

आधुनिक तंत्रज्ञान व नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन

पाली, दि. ६ ऑगस्ट :
सुधागड पाली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तालुका कृषी विभाग, सुधागड यांच्या वतीने ‘आत्मा’ अंतर्गत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा उत्साहात पार पडला.

यावेळी राजिप (पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती) सभापती वैकुंठशेठ पाटील, पंचायत समिती पालीचे सभापती व उपसभापती, तहसीलदार, राजिप सदस्य ताकुअ कदम मॅडम, कृषी विकास अधिकारी तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी, विषय विशेषज्ञ डॉ. आरेकर आणि प्रगतशील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संतोष दिवकर उपस्थित होते.
मेळाव्यात डॉ. मनोज तलाठी यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, एकात्मिक शेती पद्धती तसेच शेतीतील नवीन संधी आणि उत्पन्नवाढीचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मेळाव्याच्या निमित्ताने विविध राजभाज्यांचे आकर्षक प्रदर्शनही भरविण्यात आले होते. प्रदर्शनाला उपस्थित शेतकऱ्यांनी मोठी पसंती दर्शविली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील एकूण २५९ शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनवाढीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा यशस्वी ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here