सुनीताताई गवंडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी; सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून अभिनंदन
सुनीताताई गवंडे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी; सिंधुदुर्ग महिला काँग्रेसकडून अभिनंदन
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत सक्षम आणि कर्तृत्ववान महिलांना उमेदवारीची संधी द्यावी – जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांची अपेक्षा
सिंधुदुर्ग, दि. ४ नोव्हेंबर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनीताताई गवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती झाली असून, या निर्णयाचे सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनीताताई गवंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनीताताई गवंडे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा, महिला काँग्रेसच्या माजी महासचिव तसेच नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचा संघटनात्मक कामाचा अनुभव, महिला सक्षमीकरणासाठीचे कार्य आणि राजकीय क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास सिंधुदुर्ग महिला काँग्रेसने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी शिल्पी अरोरा यांच्या हस्ते सुनीताताईंना प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागपूर विभागातील नेतृत्वाला राज्यस्तरावर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने नागपूर विभागाचा सन्मान वाढल्याची भावनाही सिंधुदुर्ग महिला काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
सुनीताताईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि गतिमान होईल. राज्यातील महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामात योग्य संधी मिळेल तसेच नव्या महिला नेतृत्वाला पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी व्यक्त केली.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत महिलांना अधिक संधी मिळावी!
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने केवळ संघटनात्मक जबाबदाऱ्या देऊन चालणार नाही, तर महिलांना राजकीय निर्णयप्रक्रियेत आणि सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. विशेषतः २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक कर्तृत्ववान, सक्षम आणि जनतेशी जोडलेल्या महिला कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी महत्त्वपूर्ण अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी व्यक्त केली.
महिला काँग्रेसच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना संघटित करणे, त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, नव्या महिला नेतृत्वाला संधी देणे आणि राज्यभर संघटनेचा विस्तार करणे, या दिशेने सुनीताताई गवंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प