सुनेत्रा पवारांकडे या तीन खात्यांची धुरा !

0
52
सुनेत्रा पवारांकडे या तीन खात्यांची धुरा !
सुनेत्रा पवारांकडे या तीन खात्यांची धुरा !

सुनेत्रा पवारांकडे या तीन खात्यांची धुरा !

मुंबई l प्रतिनिधी

बारामती विमानतळ परिसरात झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरलेली असतानाच, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांच्याकडे कोणती खाती दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

उपस्थितीत सुनेत्रा पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शोकाकुल वातावरणात अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांकडून ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणाही देण्यात आल्या.शपथविधीनंतर जाहीर झालेल्या खात्यांनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवा कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत.

मात्र, अर्थमंत्रीपदाचेखाते त्यांना देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.

दरम्यान, शपथविधीच्या वेळेबाबत भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी “हा निर्णय घाईचा वाटतो, मात्र त्यामागे तांत्रिक किंवा राजकीय कारणे असू शकतात,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या खात्यांमुळे राज्याच्या प्रशासनात पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here