हंगेरीतील जागतिक केम्पो स्पर्धेत साताऱ्याच्या सुधीर पुंडेकर यांची चमकदार कामगिरी! भारताला दोन रौप्य पदकांचा मान
बुडापेस्ट (हंगेरी) | विशेष प्रतिनिधी
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या जागतिक क्रीडा केम्पो चॅम्पियनशिप आणि २९ व्या हंशी कप स्पर्धांमध्ये साताऱ्याच्या सुपुत्राने देशाचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला आहे. या स्पर्धेत सुधीर पुंडेकर यांनी जे (Gi) आणि नो-जी (No-Gi) सबमिशन कुस्ती प्रकारात दोन रौप्य पदके जिंकून भारताला मोठा सन्मान मिळवून दिला आहे.

हे पण वाचा वंचित जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळेंनी कुडाळ येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन.!
जगभरातील अनेक देशांतील दर्जेदार खेळाडूंशी त्यांनी अतिशय चुरशीच्या आणि तगड्या सामन्यांमध्ये सामना करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तांत्रिक कौशल्य, ताकद, संयम आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारत दोन रौप्य पदकांवर आपले नाव कोरले.
त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी झाली असून, सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्याने मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक पातळीवर पोहोचता येते, याचा आदर्श सुधीर पुंडेकर यांनी तरुण पिढीसमोर ठेवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा संघटना, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुधीर पुंडेकर यांचे या सन्माननीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!


