Kokan: साहित्य व सांस्कृतिक संघटनेमध्ये अजित राऊळ यांची नियुक्ती

0
47
साहित्य व सांस्कृतिक संघटनेमध्ये अजित राऊळ यांची नियुक्ती
साहित्य व सांस्कृतिक संघटनेमध्ये अजित राऊळ यांची नियुक्ती

वेंगुर्ला प्रतिनिधी-  साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी अजित राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-क्षत्रिय-धारपवार-चॅरिट/

अजित राऊळ हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले असून निवृत्तीनंतरही त्यांचे सामाजिक सांस्कृतिक कार्य अखंड सुरू आहे. श्रीमद् भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र इत्यादी प्रचारासाठी कार्यरत असतात. गीता परिवाराचे सक्रिय प्रचारक आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

फोटो – अजित राऊळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here