महिला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक

0
20
महिला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक
महिला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक

महिला १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक

इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा के. विनोद यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पदकाचे खाते रौप्यपदकाने उघडले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा के. विनोद या भारतीय त्रिकुटाने रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने १८९८.० गुणांची नोंद करत दुसरे स्थान मिळवले. चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर जपानने कांस्यपदक मिळवले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी इलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा के. विनोद यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताच्या पदक अभियानाची रौप्यपदकाने झालेली सुरुवात अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
भारतीय खेळाडूंच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना आगामी स्पर्धांसाठी संपूर्ण भारतीय संघाला शुभेच्छा देत खेळाडूंच्या यशाचा प्रवास असाच सुरू राहावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या सांघिक रौप्यपदकानंतर इलावेनिल वलारिवनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारातही रौप्यपदक पटकावले. त्यामुळे तिच्या नावावर या स्पर्धेत दोन रौप्यपदके झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here