पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून अमर हुतात्म्यांना आदरांजली

0
7

मुंबई :
देशाचे रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर हुतात्म्यांना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विनम्र अभिवादन केले. पोलीस स्मृती दिनानिमित्त नायगाव येथील पोलीस मुख्यालयात आयोजित ‘पोलीस स्मृतीदिन संचलन’ कार्यक्रमात त्यांनी पोलीस स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते. यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि नागरिकांनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच महाराष्ट्र राज्य लोकायुक्त संस्थेच्या विद्यमान सदस्य आणि माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उपस्थिती होती.
देशातील विविध पोलीस दलांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दिलेले बलिदान सदैव स्मरणात राहील. देशाचे संरक्षण, नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिसांच्या त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान करण्याचा हा दिवस असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here