उद्योगमंत्री उदय सामंत यांची झडपोलीतील जिजाऊ संस्थेला भेट; विविध उपक्रमांची घेतली माहिती
विक्रमगड :
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती घेतली.



